Lung Cancer Blog
 

सध्याच्या जीनोमीक आणि इम्युनोथेरपी या कॅन्सर च्या आजारांवर प्रभावी पणे कार्य करणाऱ्या उपचार पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. फुफ्फुसाचा कॅन्सर हा सर्वात सामान्य प्रकारचा कर्करोग मानला जातो. जगभरातील कॅन्सरच्या पाचपैकी एका रूग्णाचा मॄत्यू यामुळे होतो. दीर्घकालीन तंबाखू सेवन , धूम्रपान आणि नैसर्गीक कार्सीनोजेन च्या संपर्कामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो. निश्चित पणे , थोरॅसीक आॉन्कोलॉजी मध्ये जे काम करतात त्यांना हे माहीत आहे की फुफ्फुसाचा कॅन्सर हा एक धोकादायक आजार असू शकतो. परंतु सामान्य लोकांना जाणीव करून देण्यासाठी अथवा शिकवण देण्यासाठी याहून अधिक कार्य करणे आवश्यक आहे.

आरोग्य सेवेचे ओझे आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या दुष्परिणामांच्या संदर्भातील माहिती मध्ये मोठी तफावत असूनही, तंबाखूचा वापर आणि फुफ्फुसाचा कॅन्सर यांच्यातील संबंधांबाबत ची व्यक्त होण्याची खुली मानसिकता यात अंतर पडते. या पार्श्वभूमीवर फुफ्फुसाचा कर्करोग असलेले अंदाजे १५ % रुग्ण कधीही धूम्रपान करत नसल्याची माहीती अस्तीत्वात असल्याचे आढळून येते. रूग्ण उपचार शोधण्यात टाळाटाळ करू शकतात , उपचार घेण्यास विलंब करु शकतात. आणि कुटुंबातील व्यक्तींसोबत त्यांचा आजार प्रकट करण्यासाठी संकोच करु शकतात.

स्वनिरीक्षण - अत्यावश्यक बाब:

जे महिला-पुरूष स्पष्टपणे प्रत्यक्ष व प्रभावी धूम्रपान करतात आणि बहुतेक वेळा अप्रत्यक्षपणे धूम्रपान करतात , त्यांनी फुफ्फूसांच्या निगडीत जाणवत असलेल्या संकेतांपासून सावधगिरी बाळगली पाहिजे. आॉषोधोपचार असूनही खोकला , थुंकीतून रक्त पडणे , धाप लागणे , आवाजाच्या स्वरात बदल होणे आणि वजन नकळत कमी होत जाते , हे  प्रमुख स्वयंस्पष्ट संबंधीत संकेत आहेत. यातील बहुतेक संकेत दीर्घकाळ टिकून राहतात. आजार , हाडे आणि इतर अवयवांत पसरल्या नंतर वेदना होऊ लागल्याने रूग्ण तज्ज्ञांकडे खूप उशीराने पोहोचतात. ब्रॉन्कोस्कोपी किंवा स्कॅन , टिश्यु बायोप्सी द्वारे वेळेवर निदान करून घेतल्यास रोग नियंत्रणासाठी त्वरीत शोध आणि उपचारपद्धती ची मदत मिळू शकते.

सल्ला:

५० वर्षाच्या व्यक्तीने २० किंवा अधिक वर्षे दररोज एक पॅक धूम्रपान केल्याचा इतिहास असेल तर फुफ्फुसाच्या कर्करोगाने होणारे म्रुत्यूचे प्रमाण २०% पेक्षा जास्त असते. या जीवघेण्या आजारापासून स्वतःला वाचवण्यासाठी आयुष्यातील कोणत्याही टप्प्यावर धूम्रपान कायमचे सोडून देण्याशिवाय कोणताही उत्तम पर्याय नाही.